सन्मान निधी चा हप्ता 4 हजारांचा मिळणार / PM Kisan Yojna

Pm Kisan Yojna : मित्रांनो PM किसान लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षाला 3 टप्प्यात 2000 प्रमाणे 6000 रुपये मिळत असतात. पुढील 16 हप्त्यापासून 2000 एवेजी थेट 4000 रुपयांचा हफ्ता मिळणार आहे.

 

केंद्र सरकारच्या PM किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारने देखील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. आणि या योजनेचा पहिला हप्तासुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. ही योजना सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते की, राज्यातील ज्या शेतकऱ्यांना केंद्राच्या pm किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये मिळतात,त्यांना आता राज्याकडूनही सहा हजार रुपये मिळणार. म्हणजेच त्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये मिळत राहणार. आणि जेव्हा pm किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येईल तेव्हा त्यासोबतच आम्ही नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत अतिरिक्तदोन हजार रुपये देऊ असे केंद्राचे दोन हजार आणि राज्याचे दोन हजार मिळून चार हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता दि. 26 ऑक्टोबर 2023 ला वितरीत करण्यात आला आहे तर, pm किसान योजनेचा 15 वा हप्ता दि. 15 नोव्हेंबर 2023 रोजी वितरीत करण्यात आला होता. म्हणून राज्य शासनाच्याम्हणण्यानुसार आता pm किसान योजनेच्या पुढील 16 व्या हप्त्यापासून या दोन्ही योजनेचे एकत्र 4 हजार रुपये हे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत.

पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मार्च महिन्यात वितरीत केला जाईल, आणि हा 2024 वर्षाचा पहिला हप्ता असेल. त्याच्यानंतर दुसरा हप्ता जुलै महिन्यात आणि तिसरा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरीत करण्यात येईल.

Leave a comment