पीकविमा खात्यात जमा होण्यास सुरवात /Pradhan Mantri Pik Vima Yojana

Pradhan Mantri Pik Vima Yojana :  ९५% शेतकऱ्यांना अग्रिम विमा वितरित !धाराशिव जिल्ह्यात राज्यात सर्वप्रथम अग्रिम पिक विमा वितरणास सुरुवात झाली होती व साधारण ९५% शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे. तांत्रिक व इतर अडचणीमुळे जिल्हा बँकेत पिक विमा भरलेल्या व इतर काही शेतकऱ्यांना अग्रिम मिळण्यास विलंब झाला होता. मात्र कृषी आयुक्त व विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून या अडचणी दूर करत मागील २ दिवसांमध्ये यातील बहुतांश शेतकऱ्यांना अग्रिम वितरित करण्यात आला आहे.

 

आता केवळ ५% च्या आसपास शेतकऱ्यांचा अग्रिम प्रलंबित आहे. या शेतकऱ्यांना देखील लवकरच अग्रिम मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जिल्ह्यातील ५ लाखा पैकी जवळपास ४ लाख ७५ हजार शेतकऱ्यांच्या अर्जावर अग्रीम पिक विमा वितरित करण्यात आला असून आता केवळ २५,००० अर्ज प्रलंबित राहिले आहेत. मागील २ दिवसात बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम रक्कम जमा झाली आहे. ७ हेक्टर हुन अधिकचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे.

Pradhan Mantri Pik Vima Yojana :  पाहणी झालेल्या शेतकऱ्यांना देखील मंगळवार पासून तातडीने विमा वितरीत करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांची अग्रिम भरपाई रक्कम रु.१,००० पेक्षा कमी आहे, त्या शेतकऱ्यांची काही रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे, जवळपास ७००० असे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांसह उर्वरित सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर अग्रिम रक्कम वितरित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

Leave a comment