पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार 100% नुकसान भरपाई / Pik Vima

Pik Vima : मित्रांनो सध्या राज्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे भरपूर नुकसान झालेले आहे. मागील दोन दिवसांपासुन अवकाळी पाऊसाने आणि गारपीटमुळे 22 जिल्ह्यातील 4 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. आणि या नुकसानीची आकडेवारी वाढतच आहे. त्यामुळे शेतकरी हे खूप चिंतेत आहेत. या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कशा प्रकारे मिळवायची आहे. हे आपण पाहूया

महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पाऊसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकांचे भरपूर नुकसान झालेले आहे. आणि अशा शेतकऱ्यांनी जर पीक विमा काढलेला असेल आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवायची असेल तर त्यांनी नुकसान झाल्यापासून 72 तासांत म्हणजेच तीन दिवसांच्या आत विमा कंपनी कडे तक्रार करणे हे आवश्यक असते. तरच त्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई ही मिळत असते. अन्यथा त्यांनी जरी
पीक विमा काढलेला असेल तरी सुद्धा त्यांना भरपाई मधुन वगळण्यात येते.

म्हणून जर शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार जर विमा कंपनीकडे करायची असेल तर ती अतिशय योग्य पद्धतीने व योग्य कालावधीमध्ये करावी लागते. जर तुमचे अवकाळी पाऊसामुळे आणि गारपीट मुळे किंवा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर नुकसानीची तक्रार ही करू शकता. जेणे करून तुम्हाला तुमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई ही 100% मिळू शकेल.

Leave a comment