Namo Shetkari Sanman Yojna : शिंदे सरकारने केंद्रातील मोदी सरकारच्या Pm Kisan च्या धरतीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. ही योजना जें शेतकरी पीएम किसानसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पीएम किसान प्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.या सहा हजाराचे वितरण देखील पीएम किसान सारखेच केले जात आहे. म्हणजेच दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत देखील लाभ दिला जात आहे.
नमो शेतकरीचा नुकताच पहिला हप्ता वितरित झाला आहे.आता दुसरा हप्ता केव्हा वितरित होणार हा प्रश्न सर्व सामान्य शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या दुसऱ्या हफ्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या 15 व्या हफ्त्याच्या लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे. ही माहिती येत्या काही दिवसात राज्य शासनाला प्राप्त होणार आहे.राज्य शासनाकडे ही माहिती आल्यानंतर मग याची छाननी होईल आणि छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महा आयटीच्या माध्यमातून नमो शेतकरीचा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे नववर्षाच्या आधीच या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकतो अशी माहिती एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.
मात्र, या योजनेचा दुसरा हफ्ता राज्यातील जवळपास 93 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही असे चित्र आहे. कारण की, केंद्र सरकारने पीएम किसानचा पंधरावा हप्ता बँक खात्यासोबत आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना दिलेला नाही.14 वा हप्ता हा 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांना मिळाला पण पंधरावा हप्ता आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आला नसल्याने फक्त 84 लाख 67 हजार शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.यामुळे नमो शेतकरीचा दुसरा हप्ता देखील राज्यातील 84 लाख 67 हजार शेतकऱ्यांनाच मिळेल असे चित्र तयार होत आहे. म्हणजेच राज्यातील जवळपास 93 हजार शेतकरी नमो शेतकरीच्या दुसऱ्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.