जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना
कंपाऊड करावे लागते.परंतू कंपाऊड करणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत
नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपन अनुदान योजना सुरु केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कंपाऊड बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत
आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेण्यासाठी पंचायत समिती मध्ये अर्ज करू शकतात.
● अनुदान किती मिळणार :
• तार बंदी योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेतीभोवती
तारबंदी करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या चार विभागांमध्ये दिले जात आहे.
• एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर 90 टक्के
• दोन ते तीन क्षेत्र हेक्टर असेल तर 60 टक्के
• तीन ते पाच हेक्टर क्षेत्र असेल तर 50 टक्के
• पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
अनुदान किती मिळणार…
● अर्ज करण्याची आवश्यक कागद पत्र :
• सातबारा उतारा
• गाव नमुना ८ अ
• जात प्रमाणपत्र
• शेतकऱ्याचे आधार कार्ड
• एकापेक्षा जास्त शेत मालक
असल्यास अर्जदाराला प्राधिकृत
करण्याचे अधिकार पत्र