पीक विमा काढलेला असेल तर डबल पैशांचा पाऊस /Pik Vima

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल त्यांच्या साठी डबल खुशखबर आहे आणि ज्यांनी पीक विमा काढलेला नसेल त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे . ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल त्या शेतकऱ्यांना दोन प्रकारच्या माध्यमातून याठिकाणी नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नसेल त्या शेतकऱ्यांना एका माध्यमातून याठिकाणी नुकसान भरपाई ची रक्कम देण्यात येणार आहे. म्हणजेच च्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांना डबल फायदा होणार आहे व ज्यांनी पिका विमा काढलेला नाही त्यांना सुद्धा फायदा होणार आहे तर मित्रांनो फायदा कशा प्रकारे होणार आहे हे आपण सविस्तर पाहुया.

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आधी पंचनामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाला पंचनामे करण्यास सांगितले आहे.
तिन्ही विभाग काम करत असतानाही अजून पंचनामे पूर्ण झाले नाहीत. शुक्रवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू होता. पावसामुळे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पंचनामे ७ डिसेंबरच्या आधी होऊन सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या विचारात आहे.

सध्या गावपातळीवर कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून पंचनामे होत आहेत. गावातील पीकपेऱ्याची नोंद तलाठ्यांकडे आहे. मग त्या गावातील गारपीट किंवा अवकाळी पावसाचे प्रमाण आणि किती हेक्टरवर कोणते पीक आहे, यावरून कोणत्या पिकाचे किती नुकसान झाले याची नोंद केली जाते. तसेच किती टक्के नुकसान आहे, याची नोंद होते. त्याचे अहवाल राज्यपातळीवर सादर केले जातात. त्यावरून राज्यपातळीवरील नुकसान, नुकसानीची टक्केवारी आणि भरपाईची रक्कम सरकार जाहीर करते.

२८ नोव्हेंबरपर्यंत जे पंचनामे झाले त्यात ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले. पण २९, ३० नोव्हेंबर १ डिसेंबरलाही अनेक भागांत पाऊस झाला. त्याची
आकडेवारी पुढे यायची बाकी आहे. त्यामुळे नुकसानीची पातळी जास्त आहे. नुकसानग्रस्त क्षेत्र ५ लाख हेक्टरवरपर्यंत पोहचू शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. आता अनेक भागातील पाऊस कमी झाला. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी लगेच पुढे येऊ शकते, असा अंदाज आहे.

Leave a comment