नमो शेतकरी निधी योजनेचा 2 रा हप्ता या तारखेला मिळणार /Namo Shetkari Sanman Yojna

Namo Shetkari Sanman Yojna : मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबरला जमा झाल्यानंतर आता राज्य शासनाकडून “नमो शेतकरी योजने ” चा दुसरा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच पहिला हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांना तो कधी मिळेल, तसेच नमो चा पहिला हप्ता व दुसरा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल, आणि दुसरा हप्ता येण्याची तारीख काय आहे. ही संपुर्ण माहिती आपण सविस्तर पाहुया.

केंद्राने मदत दिलेल्या शेतकऱ्यांनाच राज्याच्या “नमो शेतकरी” महासन्मान योजनेसाठी पात्र ठरविले आहेत. त्यामुळे केंद्राच्या हप्त्यासाठी तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या 93 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ” नमो ” चा पहिला हप्ता मिळालेला नाही. सध्या राज्य शासनाकडून “नमो “चा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन सुरु आहे. “पंधरावा हप्ता जमा केलेल्या सर्व शेतकऱ्यांची माहिती केंद्राकडे राज्य शासनाने मागवली आहे. ही माहिती आठवडा भरात प्राप्त होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर या माहितीची छाननी करून महाआयटीकडून नमो चा दुसरा हप्ता डिसेंबर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल. असे सूत्रांचे म्हणणे आहे. आधार संलग्न बँक खात्यातच शेतकऱ्यांचा निधी पाठवला जाईल, अशी सूचना केंद्राने पुन्हा केली होती, परंतु चौदावा हप्ता देतांना अट शिथिल केली. त्यामुळे राज्यातील 85.60 लाख शेतकऱ्यांना चौदावा हप्ता मिळाला. परंतु 15 नोव्हेंबरला 15 वा हप्ता जमा करतांना अट पुन्हा लागु केली गेली, आणि फक्त आधार संलग्न बँक खात्यातच 15 व्या हप्त्याचे 2000 रु. करण्यात आले.

त्यामुळे केवळ 84.67 लाख शेतकऱ्यांना pm किसान योजनेचा निधी मिळाला. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसलेल्या 90 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 15 व्या हप्त्याचे 2000 रु. मिळाले नाहीत. परंतु या शेतकऱ्यांना वितरीत न केली गेलेली रक्कम त्यांचे बँक खाते आधार सोबत लिंक झाल्यावर त्यांना ते पैसे मिळून जातील, तशी सुविधा केंद्राने ठेवलेली आहे. असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

महसूल विभागाकडे आधी पीएम किसान योजनेची जबाबदारी होती. शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करा, शेतकऱ्यांची बॅक खवाती आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या , तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या ईकेवायसी (अर्जदाराची वैद्य ओळख ) करून घ्या. अशा महत्वाच्या तीन सूचना केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. या तीन अटी पूर्ण करणारे केवळ 70 लाख शेतकरी राज्यात पात्र ठरत होते. |

सूत्रांच्या म्हणण्यानुसार , पीएम किसान योजनेची जबाबदारी राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्या नंतर सर्व जिल्ह्यांमध्ये ई-केवायसी व आधार संलग्रता अभियान राबविण्यात आले. या कामांमध्ये क्षेत्रीय यंत्रणेने शेतकऱ्यांची खेडोपाडी , शेतशिवारात भेट घेत आधीची आधीची अटींची पूर्तता करून घेतली. त्यामुळे लाभार्थी संख्या वाढली. आता लाभार्थी संख्या 70 लाखांहून थेट 84.50 लाखां पुढे गेली.

तर आता डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नमो शेतकरी सन्मान योजनेचा 2 रा हप्ता आता या सर्व पात्र लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. तरी अजूनही बरेच शेतकरी असे आहेत जे पात्र आहेत परंतु बंक खाते आधार सोबत लिंक नसल्यामुळे त्यांना पीएम किसान चा 14 वा हप्ता तर मिळाला परंतु नमो शेतकरी योजनेच्या लाभा पासून वंचित राहावे लागले, त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांनी आता आपले बँक खाते हे आधार कार्ड सोबत जोडून घ्यायचे आहे . जेणेकरून डिसेंबर अखेरीज येणारा दुसरा हप्ता त्यांना मिळू शकेल

Leave a comment